Sunday, October 20, 2019

Vadya Pallavi | नृत्याविष्काराचे मनोहारी दर्शन

म टा |Jan 19, 2019

नादमाधुर्याची अनुभूती देणारे मरदल वादन, उत्तम पदलालित्याचा ओडिसी नृत्याविष्कार आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे पेरिणी नाट्यम् रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. शारंगदेव महोत्सवाच्या पहिल्या दिवशी या तीन कलाप्रकारांनी रसिकांना खिळवून ठेवले. लक्षवेधी नृत्य, गायन आणि वादनाने सादरीकरण उठावदार झाले.
शारंगदेव महोत्सव ओडिसी नृत्य.(फोटो-चंद्रकांत थोटे)
महागामी संस्थेच्या दहाव्या शारंगदेव महोत्सवाचा पहिला दिवस एमजीएम कॅम्पसच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी रंगला. दिवंगत गुरू बनमाली महाराणा यांच्या शिष्यांच्या मरदल वादनाने महोत्सवाला सुरुवात झाली. मरदल वाद्य ओरिसातील मंदिरात वाजवतात. या एकल वाद्याचे सुरेंद्र महाराणा आणि मानस सरंगी यांनी वादन केले. दुसऱ्या सत्रात पार्वती दत्ता आणि शिष्यांनी ओडिसी नृत्य सादर केले. 'वाद्य पल्लवी'द्वारे पारंपरिक रचनांचे मनोहारी दर्शन घडवले. पार्वती दत्ता यांची संकल्पना असलेल्या नृत्याला विशेष दाद मिळाली. त्यांना दर्शना कणसे, अश्विनी तिवारी, वैभवी पाठक, ऐश्वर्या मुंदडा, सिया बेंबडे, भार्गवी मेयेकर, शीतल भांबरे यांनी नृत्य साथसंगत केली. मनोज देसाई, श्रीया दीक्षित, निरंजन भालेराव आणि मनोज देसाई यांनी संगीत साथसंगत केली. पहिल्या दिवसाची सांगता हैदराबाद येथील कलाकारांच्या 'पेरिणी नाट्यम'ने झाली. पेरिणी तांडवम पुरुष कलाकारांनी आणि पेरिणी लास्यम स्त्री कलाकारांनी सादर केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बनमाली यांना मरणोत्तर पुरस्कार
यंदाचा 'शारंगदेव सन्मान' पुरस्कार भुवनेश्वर येथील प्रसिद्ध मरदल वादक गुरू बनमाली महाराणा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांचे पुत्र सुरेंद्र महाराणा यांनी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी मंजिरी सिन्हा, पार्वती दत्ता आणि प्राचार्य प्रताप बोराडे उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्यात बनमाली यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...