Sunday, October 20, 2019

Gandhi Parv | ‘तुम हो धीर, संजीवन भारत के’

म टा | Sep 30, 2019,

महात्मा गांधी यांच्या विचारांचा नृत्याविष्कार दाखवणारा 'गांधी पर्व' शास्त्रीय नृत्य महोत्सव लक्षवेधी ठरला. शास्त्रीय गायन, नाट्य आणि नृत्याचा संगम रसिकांसाठी पर्वणी ठरला. कलाकारांनी गांधी विचारांचा वारसा समोर मांडत नवे वैचारिक विश्व उभे केले.


महात्मा गांधी मिशन आणि महागामी गुरूकुल संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त 'गांधी पर्व' हा दोन दिवसांचा महोत्सव घेण्यात आला. रुक्मिणी सभागृहात नृत्य सादरीकरणाद्वारे महात्मा गांधींना 'कलांजली' वाहण्यात आली. महोत्सवात शनिवारी (२८ सप्टेंबर) ज्येष्ठ नृत्यांगना पार्वती दत्ता यांचे कथक सादरीकरण झाले.पं. कुमार गंधर्व रचित 'राग गांधी मल्हार' व जगप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रजा यांच्या गांधीजींना समर्पित चित्रांवर आधारित नृत्य रचना सादर करण्यात आल्या. गांधीजी रचित प्रार्थनेने सुरुवात झाली. गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि करुणा या विचारांवर आधारीत 'राग गांधी मल्हार'ची निर्मिती पंडित कुमार गंधर्व यांनी केली होती. या रचनेवर पार्वती दत्ता यांनी बहारदार नृत्य सादर केले. गांधींच्या 'तुम हो धीर, संजीवन भारत के' रचनेतून विचारांचा जागर करण्यात आला. त्यानंतर 'तुम हो सब रूप' रचना सादर झाली. चित्रकार सय्यद हैदर रजा यांनी आयुष्यभर गांधीजींच्या विचाराचे भावबंध असलेली चित्रे रेखाटली. संयमी आणि करुणामय विचारांना चित्रातून साकार केले. अशा काही चित्रांचा आविष्कार नृत्यातून दाखवण्यात आला. कबीर भजनाने सांगता करण्यात आली.

दरम्यान, महोत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी सूत्रात्मन या कार्यक्रमाने झाली. हाताने धागा विणून बनलेल्या खादी कापडाला केवळ स्वत:चे वस्त्र न मानता गांधीजींनी स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वाधीनता यांचे चिन्ह बनवले. सत्य, अहिंसा, क्षमा, विश्वास, आध्यात्म या भावनांच्या धाग्यांनी गांधींची करुणामय मुर्ती झाली आहे. गांधींचा हा प्रवास नृत्य, नाट्य, मल्टिमीडियाच्या माध्यमातून उलगडण्यात आला. या महोत्सवाला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

कोमकली यांचे गायन
महोत्सवात पंडित कुमार गंधर्व यांचे चिरंजीव भुवनेश कोमकली यांनी गायन केले. कुमारजी रचित राग गांधी मल्हार भुवनेश यांनी उत्कटतेने गायला. चारुदत्त फडके, संदीप मिश्रा, अनिरुद्ध जोशी, प्रणय सकपाळ आणि श्रीया दीक्षित यांनी संगीत साथसंगत केली. महागामी संस्था महात्मा गांधी यांच्या विचारांना बांधील आहे. या विचारांना आदर्श मानून वाटचाल करणे कर्तव्य मानते, असे पार्वती दत्ता म्हणाल्या. पंडित नाथ नेरळकर व एमजीएमचे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम यांनी कोमकली यांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...