Guru Poornima | ओडिसी नृत्यातून गुरुवंदना
मटा ऑनलाइन | Nov 12, 2017ओडिसी नृत्याचे विलोभनीय दर्शन घडवणारा ‘तस्मै श्री गुरवे नमः’ नृत्य कार्यक्रम लक्षवेधी ठरला. महागामी नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनींचे पदलालित्य कार्यक्रमांची उंची वाढवून गेले. गुरू पार्वती दत्ता यांच्या एकल नृत्याला रसिकांचा प्रतिसाद मिळाला.

महागामी गुरुकूल संस्थेने गुरू-शिष्य परंपरेला समर्पित ‘तस्मै श्री गुरवे नम:’ नृत्य महोत्सव आयोजित केला आहे. रुक्मिणी सभागृहात शनिवारी सायंकाळी महोत्सव सुरू झाला. पहिल्या दिवशी ओडिसी नृत्य सादरीकरण झाले. ‘गुरुश्लोक’ रचनेतून विद्यार्थिनींनी रसिकांना आदर्श परंपरेची महती सांगितली. त्यानंतर ‘बट्टू’, ‘सर्पजनन’, ‘नागबंध’, ‘जलबिंदू’ रचना सादर झाल्या. लक्षवेधी पदलालित्य आणि मुद्राभिनयाने नृत्य अधिक उठावदार झाले. दुसऱ्या सत्रात पार्वती दत्ता यांनी एकल नृत्य सादर केले. ‘झिंजोटी पल्लवी’, ‘अभिनय’, ‘शिवस्तुती’ या रचनेतून त्यांनी रसिकांना शास्त्रीय नृत्याच्या परंपरेची अनुभूती दिली. ‘मोक्ष’ रचनेने सांगता झाली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कथ्थक नृत्याविष्कार आज
नृत्य महोत्सवाचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. दत्ता यांच्या शिष्या कथ्थक सादरीकरण करणार आहेत. आरंभ, उद्भव व समर्पण प्रकारातून महोत्सव उठावदार केला जाणार आहे. रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment