Sunday, October 20, 2019

Guru Poornima | ‘महागामी’त उद्यापासून नृत्य महोत्सव
म टा | Sep 12, 2019

'एमजीएम'मधील 'महागामी'तर्फे गुरू-शिष्य परंपरेला समर्पित 'तस्मै श्री गुरवे नमः' या तीन दिवसांच्या नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास शुक्रवारपासून सुरुवात होत असून त्यात कथ्थक, ओडिसी आणि कलेचे पुनरावलोकन असे कार्यक्रम होणार आहेत.
महागामीच्या २३ वर्षांच्या परंपरेचा भाग असलेल्या या नृत्यसंध्येला गुरू वंदनेने सुरुवात होणार आहे. १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजित या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ओडिसी, दुसऱ्या दिवशी कथ्थक आणि तिसऱ्या दिवशी पुनरावलोकन, असे कार्यक्रम होणार आहेत. पारंपरिक शाश्वत रचनांपासून ते पार्वती दत्ता यांच्या सर्जित रचना आरंभ, उद्भव आदी वर्गाद्वारे हे सादरीकरण होणार आहे. सहा ते ५० वर्षे वयोगटांत आयोजित या कार्यक्रमात नृत्यकलाकार आपली कला सादर करणार आहेत. दोन दिवस नृत्यांचे सादरीकरण झाल्यावर रविवारी सायंकाळी 'वैखरी' ही कलाकाराच्या आयुष्यावर आधारित फिल्म दाखवण्यात येणार आहे. यावेळी 'जलदसमये' ही नृत्यनाटिका दाखवण्यात येणार आहे. रुक्‍मिणी सभागृहात दररोज सायंकाळी सात वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन 'एमजीएम'चे सचिव अंकुशराव कदम आणि 'महागामी'च्या संचालिका पार्वती दत्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले आहे.


प्रमाणपत्र, पदवी अभ्यासक्रम
नवनिर्मित एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत 'महागामी'द्वारे गुरूकुल पद्धतीवर आधारित विशेष अभ्यायक्रम सुरू करत आहेत. यात कथ्थक, ओडिसी नृत्यासाठीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डान्स अॅप्रिसिएशन विषयातील पदविका, कथ्थक आणि ओडिसी नृत्यात डिप्लोमा, तर बॅचलर ऑफ परफॉर्मन्स हा पदवी अभ्यासक्रम यंदापासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पार्वती दत्ता यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...