Sunday, October 20, 2019

शास्त्रीय नृत्याने पाहुणे अचंबित
मटा ऑनलाइन | Nov 21, 2016

भारतीय संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी भारतात आलेल्या जपानी विद्यार्थ्यांनी ‘महागामी’ संस्थेला भेट दिली. संस्थेच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी ओडिसी नृत्याचे धडे देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमात जपानचे १५ विद्यार्थी आणि पाच शिक्षक सहभागी झाले.

भारतीय संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी भारतात आलेल्या जपानी विद्यार्थ्यांनी ‘महागामी’ संस्थेला भेट दिली. संस्थेच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी ओडिसी नृत्याचे धडे देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमात जपानचे १५ विद्यार्थी आणि पाच शिक्षक सहभागी झाले.
भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या जपानच्या चमूने दोन दिवस औरंगाबाद शहरात घालवले. ‘महागामी’ संस्थेत १६ आणि १७ नोव्हेंबरला शास्त्रीय नृत्याची माहिती करून घेतली. संचालिका पार्वती दत्ता यांच्यासह शिष्यांनी जपानी चमूला मार्गदर्शन केले. भारतीय प्राचीन वारसा आणि शास्त्रीय नृत्याचा संबंध उलगडणारे नृत्य सादर करण्यात आले. ‘महागामी’च्या विद्यार्थिनींनी कोणार्क मंदिरावरील शिल्पाकृतीचे दर्शन घडवणारे ‘बातू’, ‘अरभी पल्लवी’ आणि पावसाच्या पाण्याचे विलोभनीय दर्शन घडवणारे ‘जलबिंदू’ नृत्य रचना सादर केली. जपानी विद्यार्थ्यांनीही ताल पकडत ओडिसी नृत्याचे धडे पार्वती दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. संगीत साथसंगत विनय शंकपाळ आणि श्रीकांत गोसावी यांनी केली. दुसऱ्या दिवशी चित्रकार माणिक वालावलकर यांच्याकडून विद्यार्थ्यांनी भारतीय चित्रकलेचे महत्त्व जाणून घेतले. भारतीय नृत्याचा प्राचीन वारसा समजल्यानंतर शिक्षकांनी विशेष समाधान व्यक्त केले.

सांस्कृतिक पर्यटन
‘सांस्कृतिक पर्यटन’ या संकल्पनेअंतर्गत जपानी विद्यार्थी ‘महागामी’ संस्थेत आले होते. या दोन दिवसात त्यांनी भारतीय संस्कृतीची माहिती घेतली. ‘औरा औरंगाबाद’ या कार्यक्रमातून ‘महागामी’ने औरंगाबाद शहराचा प्राचीन वारसा अधोरेखित केला आहे. आता पुन्हा एकदा सांस्कृतिक पर्यटनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

a sojourner....

ASEAN-India October 2022

  30 years of ASEAN-India ties celebrated at Udaipur The 9-day camp included artists from ASEAN countries Indonesia, Philippines, Malaysia, ...